Friday, April 26, 2024

/

पाणी पट्टी रद्द करा- नगरसेवकाच ड्रमात बसून आंदोलन

 belgaum

वंटमुरी भागातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची पाणी पट्टी कर रद्द करावी पालिकेने राज्य सरकार ला तसा प्रस्ताव पाठवावा या मागणीसाठी नगरसेवक डॉ दिनेश नाशीपुडी यांनी अनोखं आंदोलन केल आहे

गुरुवारी महा पालिके समोर ड्रम मध्ये बसून अनोखं आंदोलन करत वंटमुरी भागातील लोकांची पाणी पट्टी रद्द करण्याची मागणी केली आहे.

Dinesh nashipudiवंटमुरी वसाहतीमधील कुटुंबांना राखीव निधीतून नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. आता पाणीपुरवठा मंडळाने प्रत्येक कुटुंबाला तीन हजार रूपये पाणीपट्टी भरण्याची नोटीस पाठविली आहे.

 belgaum

याविरोधात नगरविकास खात्याकडे तक्रार केल्यानंतर वाढीव पाणीपट्टी प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना पाणीपुरवठा मंडळाला देण्यात आली आहे. पण मंडळाकडून पाणीपट्टी वसुली सुरूच ठेवली आहे, असा आरोप यावेळी नाशिपुडी यानी केला. यावेळी या भागातील नागरिक देखील उपस्थित होते.

पेशाने डॉक्टर असलेले दिनेश नाशीपुडी यांनी अनेकदा आगळी वेगळी आंदोलन करत चर्चेत असतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.