दरवर्षीप्रमाणे शहरातील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) या संस्थेतर्फे येत्या शनिवार दि. 28 ते सोमवार दि. 30 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये भव्य हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे या रथोत्सवाचे 25 वे वर्ष आहे, अशी...
भरधाव टिप्पर ची धडक ट्रॅक्टरला बसल्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष महावीर हुडेद (वय वर्षे 23) रा. विजयनगर हलगा असे ठार झालेल्या ट्रॅक्टर्स चालकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाजवळील खमकारट्टी गावाजवळ हा अपघात...
सुका कचरा सिमेंट कंपन्यांना पाठविण्यात बेंगलोर महापालिकेला देखील मागे टाकत बेळगाव महापालिकेने राज्यात आघाडी मिळवली असून गेल्या 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या काळात बेळगाव शहरातून तब्बल 4,698 टन सुका कचरा सिमेंट कंपन्यांना पाठविण्यात आला आहे.
कचरा वर्गीकरण, सुका...
कित्तूर राणी चन्नम्मा मुलींच्या निवासी सैनिक शाळेची विद्यार्थिनी तनिष्का एम. ठाकूर हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या प्रजासत्ताक दिन संचलन -2023 साठी अभिनंदन निवड झाली आहे.
कित्तूर राणी चन्नम्मा मुलींच्या निवासी सैनिक शाळेमध्ये इयत्ता 9 वीमध्ये शिक्षण घेणारी तनिष्का एम....
बेळगाव लाईव्ह : जमीन खरेदी व्यवहारात लाच घेतल्याप्रकरणी चिकोडी येथील वरिष्ठ उपनिबंधक आणि त्यांच्या कार्यालयीन सहाय्यकांवर कर्नाटक लोकायुक्तांनी कारवाई केली आहे.
फिर्यादी राजू लक्ष्मण पाच्छापूर (रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. चिकोडीचे वरिष्ठ...
बेळगाव शहराचा केंद्रबिंदू असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती आणि तेथील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा येत्या शनिवार दि 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता 'न भूतो न भविष्यती' अशा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे, अशी...
बेळगाव महापालिकेचे उपमहापौरपद इतर मागास जाती -ब प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले असून सदर जात प्रमाणपत्र संपूर्ण तपासणी व पडताळणी अंती इच्छुक उमेदवारांना अदा केले जावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे व अन्य कांही नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे...
बेळगाव लाईव्ह : रॉयल राज गोल्डन प्रा. लि. या कंपनीच्या वतीने बेळगावमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग आणि ग्लोबल शेअर मार्केट संदर्भात १ दिवसीय कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे.
३० जानेवारी २०२३ रोजी 'युके 27' येथे हि कार्यशाळा भरविण्यात आली आहे. सकाळी ८ ते...
सरकारच्या विविध समाजपयोगी योजना जातीने लक्ष देऊन यशस्वीरित्या राबविण्याबरोबरच गाव स्वच्छतेसाठी मोठे प्रयत्न करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीसह 14 ग्रामपंचायतींना 2021 -22 सालचा 'गांधीग्राम पुरस्कार' पुरस्कार जाहीर झाला आहे.
गांधीग्राम पुरस्कार हा 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त देण्यात...
भारतीय निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देण्यात येणारा राज्य पातळीवरील 'सर्वोत्कृष्ट निवडणूक अधिकारी' हा पुरस्कार बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना जाहीर झाला आहे.
भारतीय निवडणूक आयोग आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा पुरस्कार जाहीर केला. बेंगलोर येथील टाऊन हॉलमध्ये...