बेळगाव लाईव्ह : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महामेळावा घेण्यापासून रोखण्यात आले, ज्यामुळे महाराष्ट्रात संतापाचे पडसाद उमटले. दोन्ही राज्यांदरम्यान बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून, सीमाभागात तणावाचे वातावरण आहे, ज्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ठाकरे गट आणि कन्नड संघटनांकडूनही निषेध आंदोलने सुरू आहेत.
कर्नाटकमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी बेळगावला जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एसटी डेपोत जोरदार निदर्शने करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे. तर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तणावाचे वातावरण झाल्याने कर्नाटक- महाराष्ट्र एसटी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
बेळगावात आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता. पण मेळाव्याला जातानाच एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने या महामेळाव्याला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संताप पसरला असून त्याचे लोण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे.
कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीचा कोल्हापुरात ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला. कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाने मध्यवर्ती बस स्थानक परिसरात निदर्शन केली आहेत. ठाकरे गटाने कर्नाटकच्या बस रोखून आपला निषेध नोंदवला आहे. ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आंदोलन छेडण्यात आले. कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या आज बेळगावमध्ये होणाऱ्या मेळाव्याला परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. अधिवेशनादरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून एसटी बस सर्वाधिक टार्गेट होण्याची शक्यता असल्याने कर्नाटक ते महाराष्ट्र बस सेवाच तात्पुरती बंद करण्यात आली आहे. बेळगाव, निपाणी बस डेपोतून महाराष्ट्रात जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या आहे.
कोल्हापुरात कर्नाटकच्या बसवर निषेध नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात जाणारी केएसआरटीसी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी बस स्थानकापर्यंतच वाहतूक सुरू होत्या. आता निपाणी बस स्थानकावर केएसआरटीसी बसेस थांबल्या आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीमुळे बस वाहतूक बंद करण्यात आल्या आहेत. तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
कर्नाटक नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी बेळगावाच्या अथणी शहरात महाराष्ट्रातील बस थांबवून निषेध केला आहे. कर्नाटक नवनिर्माण सेना शिवरामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या बस थांबवून निषेध नोंदवला आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेना नेत्यांनी कर्नाटक परिवहन बस थांबवली होती. कर्नाटक बस थांबवल्याचा निषेध करण्यासाठी कर्नाटक नवनिर्माण सेनेने उद्दामपणा दाखवून दिला आहे.



Nothing will happen because all political leaders both Karnataka as well as Maharashtra leaders only stunt because when you are suffering from disease w have to take medicine both site leaders political that is I suggestion is to keep quite nothing will happen it is going on and on