बेळगाव लाईव्ह :बेळगाव–धारवाड रेल्वेमार्ग (कित्तुर मार्गे) प्रकल्पाला पुन्हा विलंब होत असून जमीन संपादनाची भरपाई रोखल्याने काम ठप्प झाले आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तीन महिन्यांपूर्वी कित्तूर मार्गे बेळगाव–धारवाड रेल्वे लाईनसाठी जमीन संपादन जवळपास पूर्ण झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, राज्य सरकारकडून जमीनमालकांना भरपाई न मिळाल्याने जमीन रेल्वेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया थांबली आहे.
788.1 एकरपैकी बेळगाव जिल्ह्यात 406.1 एकर आणि धारवाड जिल्ह्यात 382 एकर जमीन संपादित केली जात आहे. बेळगाव कडून प्रस्तावित ₹149.2 कोटींची भरपाई अद्याप मंजुरीसाठी प्रलंबित आहे, तर धारवाडच्या ₹94 कोटींच्या प्रस्तावालाही मान्यता मिळालेली नाही.
याबाबतबअधिकाऱ्यांनी सांगितले की, निधी रिलीज न होणे हेच प्रकल्पातील मुख्य अडथळा आहे
माजी केंद्रीय मंत्री कै. सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नांमुळे सात वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या ₹937 कोटींच्या प्रकल्पात, नियमानुसार राज्य सरकारने जमीन विनामूल्य उपलब्ध करून देणे आणि प्रकल्पखर्चात 50% वाटा उचलणे अपेक्षित आहे.


