बेळगाव लाईव्ह -आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे सोमवारी मोक्षदा एकादशी दिवशी गीता जयंती साजरी करण्यात आली.भगवान श्रीकृष्णानी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगितली तो हा दिवस म्हणून गीता जयंती केली जाते.
मोक्ष, शांती व पितृ कल्याण देणारी पवित्र एकादशी म्हणून मोक्षदा एकादशी मानली जाते या दिनाचे औचित्य साधून इस्कॉन तर्फे भगवद्गीतेतील 700 श्लोकांचे पठण दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा पर्यंत इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे करण्यात आली.
सहाशेहून अधिक भक्तानी या कार्यक्रमात भाग घेतला. समोर बसविण्यात आलेल्या स्क्रीनवर मराठी व कन्नड या दोन्ही भाषांतून संपूर्ण श्लोक सादर करण्यात आले.त्यानंतर भजन ,कीर्तन झाले.
सायंकाळी सात नंतर माधव कृपादास यांचे गीता जयंती वर प्रवचन झाले. प्रसादाचे वितरण केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली
या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.




