belgaum

न्यायालय आवारात वाहतूक ई -चलन दंड भरणा बूथचा शुभारंभ

0
55
 belgaum

बेळगाव लाईव्ह :प्रलंबित वाहतूक दंड वसूल करण्यासाठी राज्य सरकारकडून दंडामध्ये 50 टक्के सवलत देण्याच्या उपक्रमाचा आज शुक्रवारी सकाळी बेळगाव न्यायालय संकुल आवारात बूथ अर्थात केंद्र स्थापून शुभारंभ करण्यात आला आहे.

प्रलंबित वाहतूक दंड वसूल करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा या दंडामध्ये 50 टक्के सवलत देण्याचा आदेश जारी केला आहे. या गेल्या 21 नोव्हेंबरपासून पुढील 12 डिसेंबर 2025 पर्यंत आपला प्रलंबित वाहतूक दंड भरणाऱ्या वाहन मालक व चालकांना दंडामध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे.

आपल्या न्यायालयीन कामकाजासाठी शहरासह जिल्ह्यातील लोक बेळगाव न्यायालयामध्ये मोठ्या संख्येने येत असतात हे लक्षात घेऊन वाहतूक ई -चलन स्वरूपातील दंड भरण्यासाठी संकुल न्यायालय आवारामध्ये बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.

 belgaum

वाहतूक इ चलन दंड भरण्याच्या या बुथचा शुभारंभ आज सकाळी मोठ्या उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी बेळगाव लोक अदालतीच्या चेअरमनसह बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी, ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. मारुती कामान्नाचे, ॲड. सुधीर चव्हाण, पोलीस निरीक्षक निकम यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.

वाहतूक ई चलन दंड भरण्यासाठी बेळगाव न्यायालय संकुल (कोर्ट कॉम्प्लेक्स), त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार आणि मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी बुथ स्थापण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त वाहन चालक व मालक आपले जवळचे रहदारी पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय स्वागत कक्षाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी, अशोकनगर, दूरदर्शन नगर (टीव्ही सेंटर), रिसालदार गल्ली (जुनी महापालिका बिल्डिंग) किंवा गोवावेस येथील कर्नाटक वन अथवा बेळगाव वन केंद्र या ठिकाणी दंड भरून पावती घेऊ शकतात.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.