बेळगाव लाईव्ह :ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने बेळगाव जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्यावतीने शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी बेळगांव येथे महिला क्रीडापटूंसाठी जिल्हास्तरीय ‘अस्मिता लीग अथलेटिक्स स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. तरी बेळगाव जिल्ह्यातील संबंधित क्रीडापटूंनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा सुभाष चंद्र बोस (लेले) मैदान टिळकवाडी, बेळगाव येथे आयोजित करण्यात आली असून स्पर्धेला शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता प्रारंभ होईल. स्पर्धेस येते वेळी महिला क्रीडापटूंनी सोबत पुढील कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.
1) महानगर पालिक/ तहशिलदार यांनी जारी केलेला जन्म दाखला. 2) आधार कार्ड. या स्पर्धा फक्त मुलीसाठी असणार असून 14 वर्षाखालील मुलींच्या वयोगटासाठी स्पर्धक 21-12-2011 आणि 20-12-2013 दरम्यान जन्मलेली असावी. क्रीडा प्रकार : ट्रायथलॉन (ए) -60 मी. धावणे, लांब उडी, उंच उडी. ट्रायथलॉन (बी)-60 मी. धावणे, लांब उडी, बॅक थ्रो. ट्रायथलॉन (सी)- 60 मी. धावणे, लांब उडी, 600 मी. धावणे. सर्वांसाठी किड्स भालाफेक.
16 वर्षाखालील मुलींच्या वयोगटासाठी स्पर्धक 21-12-2009 आणि 20-12-2011 दरम्यान जन्मलेली असावी. क्रीडा प्रकार : 60 मी. धावणे, ,600 मी. धावणे, उंच उडी (फक्त सिझर), लांब उडी (5 मी. अप्रोच), गोळाफेक (स्टॅंडिंग) थाळी फेक, भालाफेक (10 मी. अप्रोच)
यापैकी कोणत्याही दोन क्रीडा प्रकारात स्पर्धक भाग घेऊ शकतात, असे बेळगाव जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे सचिव अशोक शिंत्रे यांनी कळविले आहे तसेच अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी मधुकर देसाई (9986594116) अथवा आनंद पाटील (7892-847046) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.



