बेळगाव लाईव्ह : शहरात अमली पदार्थ सेवन आणि कच्ची दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईची मालिका सुरू ठेवत शहापूर आणि मारीहाळ पोलीस ठाण्यांनी मिळून चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई 16 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
शहापूर पोलिसांची धडक कारवाई : अमली पदार्थांच्या नशेत तिघे जाळ्यात
शहापूर पोलीस ठाण्याचे पीआय एस. एस. सीमानी यांच्या पथकाने वडगाव येथील जाइल स्कूलजवळ संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे उघड झाले. अटक केलेल्या आरोपींची नावे अशी :
• चेतन जगदीश कारळेकर (21), रा. यरमाळ रोड, वडगाव
• प्रविण मनोहर नायक (28), रा. महात्मा फुले गल्ली, वडगाव
• सूरज शिवनाथ अनैकर (24), रा. कारभार गल्ली, वडगाव
तिघांवर गु.र.नं. 117, 118 आणि 119/2025 अंतर्गत NDPS कायद्यातील कलम 27(b) नुसार गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
मारीहाळ पोलिसांची छापा मोहीम : कच्ची दारू विक्रेत्याला अटक
दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे मारीहाळ पोलिसांनी चंदूर गावातील बेळगाव-गोकाक रस्त्यालगत भूमीका ढाब्याच्या मागे कच्ची दारू विक्री करणाऱ्यावर छापा घातला. आरोपी :
• मंगेश मारुती काशीकरी (26), रा. हनुमान गल्ली, चंदूर
त्याच्याकडून दोन टायर ट्यूबमध्ये भरलेली अंदाजे 20 लिटर कच्ची दारू (किंमत सुमारे 3,000 रुपये) तसेच 130 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. मारीहाळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. 142/2025, कलम 32, 34 अबकारी कायदा 1965 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकूण कारवाईचा तपशील :
अटक आरोपी : 4
जप्त माल : रु. 3,130/- किंमतीची कच्ची दारू व रोख
या संयुक्त कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी संबंधित पथकांचे कौतुक केले आहे.


