बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अनधिकृतपणे कॉल सेंटर चालवून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बेळगाव सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत विविध राज्यांमधील एकूण ३३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक ११-११-२०२५ रोजी अंतर्गत सुरक्षा विभागाच्या माहितीवरून आणि एका निनावी पत्राच्या आधारावर सायबर गुन्हे पोलीस ठाण्याचे एएसआय एल. एस. चिनगुंडी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९/२०२५, कलम ३१९(२), १८७ भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याच्या कलम ६६(सी) आणि ६६ (एल) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपास पुढे नेत पोलिसांनी बेळगावातील अजमनगर सर्कलजवळ असलेल्या कुमार हॉलवर छापा टाकला. येथे अनधिकृत कॉल सेंटर चालवणाऱ्या ३३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींमध्ये गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मेघालय, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड आणि नागालँड अशा विविध राज्यांतील व्यक्तींचा समावेश आहे.
आरोपींची नावे : प्रीतेश नवीनचंद्र पटेल (गुजरात), आशुतोष विजयकुमार झा (दिल्ली), मीत राजूभाई गुप्ता (गुजरात), करण बहादूर राजपूत (गुजरात), हरिकिशन विष्णू प्रसाद उपाध्याय (गुजरात), सुरज रामकीरत यादव (मुंबई, महाराष्ट्र), सुरेंद्र गणपतसिंग राजपुरोहित (मुंबई, महाराष्ट्र), रोहन दुधनाथ यादव (मुंबई, महाराष्ट्र), पुष्पराज स्वामी मुरघन (मुंबई), क्रिस्टोफर अल्पनासो पीटर (मुंबई), विशाल विजयन पणेकर (महाराष्ट्र), पुष्पेंद्रसिंग शेखावत (राजस्थान), लोकेंद्रसिंग राजेंद्रसिंग तवर (राजस्थान), नितीशसिंग निरंजनसिंग सिंग (मेघालय), निखिल दानसिंग मेहता (उत्तराखंड), अभिषेक बलबीरसिंग राठोड (हिमाचल प्रदेश), सुब्रानिल भाद्रा (कोलकाता), जितेंद्र सिंग (उत्तर प्रदेश), नवीनकुमार (झारखंड), आकर्षणकुमार साही (झारखंड), राहुलकुमार साही (झारखंड), फरवेज सय्यद (महाराष्ट्र), अजितकुमार मेहतो (झारखंड), मानसी रभा कटेनारवा (आसाम), प्रीती बबलू सिंग (दिल्ली), जेरीमार्क जॉय (मेघालय), पेरीसिसा लाझर तोतरमुडे (मुंबई, महाराष्ट्र), लोंगोटीया संगतम (नागालँड), लक्ष्य पुनीत शर्मा (दिल्ली), स्मित धर्मेंद्र काडीया (गुजरात), दर्शन विष्णू कदम (मुंबई), सौरज रीझा (मेघालय), पंकज कृष्णा तमांग.
जप्त केलेल्या वस्तूंचा तपशील : पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ८,१०,००० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असून यात ३७ लॅपटॉप (अंदाजित किंमत ₹ ६,५०,०००), ३७ मोबाईल फोन (अंदाजित किंमत ₹ १,५०,०००), तसेच तीन वाय-फाय राऊटर (अंदाजित किंमत ₹ १०,०००) यांचा समावेश आहे.
या आरोपींनी अमेरिकेतील नागरिकांना एसएमएसद्वारे तुमचा ‘अॅमेझॉन ऑर्डर प्लेस झाला आहे’ असा संदेश पाठवला. तसेच, त्यात काही त्रुटी असल्यास ‘खाली दिलेल्या अॅमेझॉन कस्टमर सर्व्हिस नंबरवर कॉल करा,’ असा संदेश पाठवून फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.


