बेळगाव लाईव्ह :एम एस टेक्सटाइल हाऊसचे संचालक सतीश तेंडुलकर यांची बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन (BCMA) या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन ही उत्तर कर्नाटकातील सर्वात जुनी व मोठी वस्त्र, रेशीम आणि हातमाग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. या संघटनेत सुमारे 500 हून अधिक सभासदांचा समावेश आहे.
या संघटनेचे अध्यक्ष पदग्रहण कार्यक्रम
मंगळवार, दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता हॉटेल आदर्श पॅलेस, मिलेनियम हॉल येथे होणार आहे.
कोण आहेत सतीश तेंडुलकर
सतीश तेंडुलकर हे व्यक्तिमत्व बेळगावकरांसाठी नवीन नाही सिटीझन कौन्सिल, चेंबर ऑफ कॉमर्स इतर संघटनांच्या माध्यमातूनअनेक समस्या सोडविण्यात त्यांनी भूमिका निभावली आहे त्यामुळे बेळगावकरांच्या परिचयाचे आहेत.
तेंडुलकर हे जवळपास 95 वर्षे जुने असलेल्या एम/एस टेक्सटाइल हाऊस, खडेबाजार मधील या प्रतिष्ठित फर्मचे संचालक आहेत. त्यांनी बेळगाव आणि परिसरातील अनेक समाधानी ग्राहकांना सेवा पुरवली आहे.
सतीश तेंडुलकर हे गेली 15 हून अधिक वर्षे बेळगावच्या सामाजिक पटलावर सक्रीय आहेत. केवळ 35 व्या वर्षी चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. त्यांच्या कार्यकाळात गोवा सरकारकडून बेळगावच्या व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेला एन्ट्री टॅक्स रद्द करण्यात त्यांनी यश मिळवले — जो आजही लागू नाही.
त्यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना बेलगाव शहराला रेल्वे जोडणी मिळवून देण्यात पुढाकार घेतला. तसेच भारत सरकारच्या बेळगाव पोस्ट फोरमचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बेळगावला पासपोर्ट कार्यालय मिळवून दिले. ट्रेडर्स कौन्सिलचे अध्यक्ष तसेच सिटिझन्स कौन्सिलचे प्रतिनिधी म्हणून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
सध्या ते बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या वस्त्र, हातमाग आणि रेशीम व्यवसायिकांच्या संघटनेचे प्रतिनिधित्व करीत आहेत.


