बेळगाव लाईव्ह :पावसात विद्युत पाण्याची मोटार सुरू करताना शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बंबरगे गाव परिसरात घडली आहे.
अमोल विवेकानंद जाधव उर्फ (लालू ) वय 43 असे मयत युवकाचे नाव आहे.याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार कंग्राळी खुर्द येथील रामनगरचा रहिवाशी असलेला अमोल विवेकानंद जाधव (लालू ) हा त्यांच्या बंबरगा या ठिकाणी असलेल्या पोर्ल्टी फार्म मध्ये कोंबड्यांना खाद्य पाणी घालण्यासाठी गेला होता त्यावेळी ही घटना घडली आहे.
शुक्रवारी दुपारी 3.30 च्या दरम्यान पाऊस सुरू होता त्यावेळी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला असता विद्युत प्रवाहाचा जोराचा धक्का लागून तो पडला त्याच्या सोबत पत्नी होती त्यानी लागलीच इतरांना फोन करून या घटने बाबत माहिती दिली त्यानंतर उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटलला दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. झालेचे घोषित केले सदर बातमी हेस्कॉम व पोलीस विभागाला देण्यात आली .
शनिवारी मृतदेहाचे शवविच्छेदन दि. 25 रोजी करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येणार असून सकाळी 11 वाजता अत्यसंस्कार होणार आहेत असे सांगण्यात आले .
मयत अमोल एक मनमिळावू व शांत स्वभावाचा तरुण होता . त्याचा पश्चात पत्नी , मुलगा आई वडील , भाऊ , विवाहित बहिण असा परिवार आहे.


