बेळगाव लाईव्ह : चुकीची माहिती देऊन बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकांचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी राज्यभरातील अडीच बीपीएल शिधापत्रिका रद्द करत त्याचे रुपांतर एपीएलमध्ये केला आहे. याचा फटका पाच लाखांहून अधिक लोकांना बसला आहे.
गत तीन महिन्यांपासून अन्न व नागरी पुरवठा खात्याने पात्र नसलेल्या बीपीएल शिधापत्रिका रद्द करण्याची मोहीम सुरु केली आहे. महसूल खाते, प्राप्तीकर खात्याकडून माहिती घेत कारवाई करण्यात येत आहे. उत्पन्नाचे स्रोत शोधून अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना नोटीस बजावण्यात येत आहे.
त्याचबरोबर स्वस्त धान्याच्या दुकानदारांकडे यादी पुरविण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. यापूर्वी अनेकांनी बीपीएल कार्डे जमा करुन एपीएल कार्ड घेतली आहेत. त्यातून ३.६५ लाखांहून अधिक कार्ड एपीएल करण्यात आली.
मागील दोन महिन्यात २ लाख बीपीएल कार्ड रद्द करण्यात आली.४५ दिवसांची मुदत अधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना नोटीस बजावण्यात येत आहे. पात्र असूनही बीपीएल कार्ड रद्द केलेले असल्यास पुन्हा बीपीएलसाठी अर्ज करण्यास ४५ दिवसांची मुदत दिली आहे. संबंधित कागदपत्रांसह तहसीलदारांकडे अर्ज करावा लागत आहे. कागदपत्रांची छाननी करून पात्र असल्यास बीपीएल कार्ड पुन्हा देण्यात येत आहे.
अपात्र शिधापत्रिकांची माहिती तपशील रद्द केलेली कार्डई केवायसी न केलेले ६,१६,१९६, १.२० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणारे ५,१३,६१३ आंतरराज्य शिधापत्रिकाधारक ५७,८६४ ७.५ एकरपेक्षा अधिक जमीन असणारे ३३,४५६ ६ महिन्यांपासून रेशन न नेणारे – १९,८९३ कंपनीमध्ये संचालक असणारे १९,६९०
२५ लाखांपेक्षा उलाढाल असणारे २,६८४ मृत्त सदस्य- १,४४६


