Friday, December 5, 2025

/

पथसंंचालनात भाग घेतल्याबद्दल विद्यार्थ्याला शिक्षा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रविवारी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनात भाग घेतल्याबद्दल कॅम्प मधील एका नामवंत हायस्कूलमध्ये पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला भाग घेतल्याबद्दल वर्गाबाहेर उभा करून शिक्षा देण्यात आली याबद्दल शहरात संतापाची लाट उसळली आहे

कॅम्प मधील नावाजलेल्या या शाळेत सोमवारी शाळेच्या टीचरने त्या विद्यार्थ्यांचा फेसबुक वरील व्हिडिओ आणि ड्रेस घातलेला ( गणवेश) संपूर्ण वर्गात दाखवून त्या मुलाचा घोर अपमान केला वारंवार वर्गाच्या बाहेर त्याला उभे करून अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे त्या मुलाने सायंकाळी घरी गेल्यावर ही घटना आपल्या पालकांना सांगितली.

रविवार हा सर्वांना सार्वजनिक सुट्टीचा वार असल्यामुळे पालकांनी कोणता निर्णय घ्यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण या शिक्षकसंपूर्ण वर्गात त्या मुलाचा फोटो व्हिडिओ दाखवून एकच खळबळ माजवली. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भीती निर्माण झाली.

 belgaum

दुसरे दिवशी मंगळवारी आपण शाळेला जात नाही असा हट्ट धरल्यामुळे पालकांना सुद्धा मोठा त्रास भोगावा लागला.आता लोकप्रतिनिधी, खासदार, नगरसेवक कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष वेधून लागले आहे.

त्या शिक्षिकेने माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.