बेळगाव लाईव्ह : कर्तव्यदक्ष चातुर्य आणि साहस दाखवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची कमतरता या देशात कमी नाही आहे. अशाच एका रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलने धावत्या रेल्वेतून पडणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचवण्याची घटना बेळगाव रेल्वे स्थानकावर शुक्रवारी घडली आहे.
या घटनेत धावत्या रेल्वेतून तोल जाऊन पडलेल्या 55 वर्षीय प्रवासाचा जीव वाचवतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या कॉन्स्टेबल चे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेत सुमारे 55 वर्षीय प्रवासी धावत्या 16210 मैसूर–अजमेर एक्सप्रेसच्या स्लीपर कोचमधून उतरत असताना तोल जाऊन प्लॅटफॉर्मवर पडला आणि डबा व प्लॅटफॉर्म यांच्या मधल्या फटीत अडकण्याची शक्यता निर्माण झाली.
ही घटना लक्षात येताच आरपीएफ पोस्ट बेळगावचे मुख्य कॉन्स्टेबल श सी. आय. कोप्पद यांनी तात्काळ प्रतिसाद देत अत्यंत चातुर्य आणि धैर्य दाखवले. त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत प्रवाशाला फटीत अडकण्यापूर्वीच ओढून सुरक्षित स्थळी आणले आणि एक गंभीर अपघात होण्यापासून बचाव केला.

नंतर त्या प्रवाशाची ओळख भरमा गंगाराम कुंभार (वय 55) रा. बसुरुते, उचगाव, जि. बेळगाव अशी आहे. त्यांनी सांगितले की ते आपल्या नातू लक्ष्मी राजाराम कुम्बार याला बेळगावहून पुण्याकडे जाणाऱ्या गाडीत चढवण्यासाठी स्थानकावर आले होते. नातूला सोडताना त्यांनी गाडीत प्रवेश केला होता, मात्र गाडी सुटू लागल्यावर घाबरून धावत्या गाडीतून उतरायचा प्रयत्न केला आणि त्यावेळी ते घसरले.
आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या तत्पर आणि शौर्यपूर्ण कृतीमुळे प्रवाशाचा जीव वाचला. प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तातडीने प्रथमोपचार देण्यात आला.


