बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील सुभाषचंद्रबोस लेले मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव शहराचे प्रतिनिधित्व केलेल्या संत मीरा शाळेने दुहेरी मुकुट, तर सेंटपॉल,सेंट जोसेफ ही विजेते ठरले.
प्राथमिक मुलांच्या अंतिम सामन्यात सेंटपॉल बेळगांव शहरने सर्वोदय खानापूरचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला विजयी संघाच्या नेविन पत्कीने 2,आराध्या नाकाडी व विधित यांनी प्रत्येकी 1 गोल केले.मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगाव शहरने सेक्रेड हार्ट बेळगांव ग्रामीण संघाचा 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या रितू हिने एकमेव गोल केला.
माध्यमिक मुलांच्या गटात संत मीरा बेळगाव शहरने सर्वोदय खानापूरचा 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या कर्णधार अब्दुल मुल्ला यांने एकमेव विजयी गोल केला.तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत सेंट जोसेफ बेळगाव शहराने सेंट जोसेफ बेळगाव ग्रामीणचा सडनडेथवर. 4-3 असा पराभव केला, विजयी संघाच्या किंजल, गौतमी, वैष्णवी, सानिका ,तर पराभूत संघातर्फे मेघा ,चैत्रा, अन्नपुरमेश्वर यांनी गोल केला.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे क्रीडा भारती राज्य सचिव अशोक शिंत्रे,उद्योजक के आर शेट्टी स्पोर्ट्स फाउंडेशनचे पुनित शेट्टी, प्रसन्ना शेट्टी शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब ,सचिव पवन कांबळे, पीईओ जहिदा पटेल, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सिल्विया डिलिमा, सचिव प्रवीण पाटील, कॅम्प विभागाचे अध्यक्ष नागराज भगवंतण्णावर , बापू देसाई चंद्रकांत पाटील जयसिंग धनाजी किरण तरळेकर ,या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी क्रीडाशिक्षक अनिल जनगौडा रामलिंग परिट, अर्जुन भेकणे, संतोष दळवी, उमेश बेळगुंदकर मारुती मगदूम शिवकुमार सुतार, उमेश मजुकर,आय एम पटेल,अनिल गंबीर पंच मानस नायक, हर्ष रेडेकर,विजय रेडेकर,शुभम यादव,कौशीक पाटील, यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार सुंकद तर चंद्रकांत पाटील आभार मानले.




