बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे विजयादशमीनिमित्त चव्हाट गल्ली येथील श्री जोतिबा देवस्थान येथून मानाची पालखी, सासनकाठी व नंदी आज दुपारी देवघरातून बाहेर पडून बेळगावच्या सीमोल्लंघन कार्यक्रमासाठी रवाना झाले.
बेळगाव शहरात आज विजयादशमी दिवशी सीमोल्लंघनचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमासाठी परंपरेनुसार चव्हाट गल्ली येथील बेळगावची मानाची पालखी, सासनकाठी व नंदी आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास देवघरातून बाहेर पडले. याप्रसंगी बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत -पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्य आणि गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर पालखी व सासनकाठी नंदीसह पारंपारिक वाद्याच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून सीमोल्लंघन मैदानावर जाण्यासाठी रवाना झाले. चव्हाट गल्ली श्री जोतिबा देवस्थानाच्या ठिकाणी बोलताना रणजीत चव्हाण पाटील यांनी सांगितले की, पूर्वापार परंपरेनुसार आज चव्हाट गल्ली येथील श्री ज्योतिबा देवस्थानाची पालखी आणि सासनकाठी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील दसरोत्सवाला प्रारंभ होत आहे.
ज्योती कॉलेज जवळील मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर आज सायंकाळी सिमोल्लंघन अर्थात सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. सिमोल्लंघनवेळी सदर मैदानाच्या रिंगणामध्ये शस्त्र पूजनासाठी वाडवडिलांपासून आमच्या घराण्याची तलवार ठेवली जाते. सिमोल्लंघन शुभारंभाचा मान आमच्या घराण्याला असला तरी सात -आठ वर्षांपासून या कार्यक्रमांमध्ये शहर शहर देवस्थान मंडळाला समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

फार पूर्वीपासून चव्हाट गल्लीचा नंदी हा या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण असतो. शहराच्या विस्ताराबरोबरच भक्तांची संख्याही वाढत आहे. मात्र आम्ही दसरा सणाशी संबंधित जुन्या परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असून यापुढेही त्यांना प्राधान्य दिले जाईल असे सांगून आज सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी नागरिकांनी सिमोल्लंघन कार्यक्रमासाठी मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर जमावे.
तसेच सर्व पालख्यांनी चव्हाट गल्लीच्या नंदीला अग्रस्थानी ठेवून मार्गस्थ व्हावे, असे आवाहन रणजीत चव्हाण -पाटील यांनी केले.




