बेळगाव लाईव्ह :जिद्द, अनुशासन आणि सतत शिकण्याची वृत्ती हे तुमच्या यशाचे तीन खांब आहेत; छोट्या प्रयत्नांना महत्त्व द्या आणि मोठी स्वप्ने आपोआप साकार होतील. असे प्रतिपादन सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी केले.
दि. बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बेळगाव यांच्या वतीने सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव समारंभ नुकताच सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला.
त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मारुती सदावर होते. व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन शिवाजी शहापूरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. व्ही. व्ही. गोदे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे रणजीत चौगुले यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
रणजीत चौगुले यांनी विद्यार्थ्यांना गुणांतील आकडे महत्त्वाचे असले तरी, समज आणि कौशल्ये अधिक मौल्यवान आहेत त्यामुळे अभ्यास करताना प्रश्न विचारा आणि चुका सुधारून पुढे या. तसेच त्यांच्या अभ्यासपद्धतीबद्दल, वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल आणि भविष्यातील उद्दिष्टे साध्य करण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात एकूण 125 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे व इतर वस्तु देऊन गौरवण्यात आले. त्याचे वाचन एम. एस. सनदी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्ही. व्ही. गोदे यांनी केले. यावेळी संचालक कृष्णराव मोदगेकर, मल्लाप्पा चौगुले, सौ निर्मला कामुले, रमेश मोदगेकर, मिलिंद पावशे, रघुनाथ पाटील,नंदा बिर्जे, उदय किल्लेकर, किसन रेडेकर, जयवंत खन्नुकर उपस्थित होते.



