बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्याचे येत्या 31 डिसेंबरपूर्वी विभाजन करून स्वतंत्र अशा चिक्कोडी जिल्ह्याची निर्मिती केली जाईल, अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
बेळगाव येथे पोषण अभियान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महिला आणि बालविकासासाठी निधी वाढवला आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नती मिळेल.
गृह लक्ष्मी योजनेसारख्या योजना महिलांना आर्थिक मदत पुरवत असून महिला व बाल कल्याण विभागाला 30,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


