बेळगाव लाईव्ह: कृषी पणन खाते बंगळुरूनी बेळगावातील जय किसान या खाजगी होलसेल भाजी मार्केटचा परवाना रद्द केल्या नंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तात्काळ भाजी मार्केट ए पी एम सी मध्ये स्थलांतर करण्याचा आदेश बजावल्या नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांनी देखील जय किसान भाजी मार्केटला नोटीस बजावली आहे.
जय किसान भाजी मार्केटात होणारा भाजीपाला व्यापार कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार व्यवसाय (नियमन आणि विकास) कायदा, १९६६ च्या कलम ८ चे उल्लंघन करणारा आहे असे ए पी एम सी सचिवांनी दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
बेंगळुरु कृषी पणन संचालकांच्या आदेशानुसार जय किसान घाऊक भाजीपाला व्यापारी संघटनेचा खाजगी भाजीपाला बाजार परवाना रद्द करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोणताही भाजीपाला व्यापार कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार व्यवसाय (नियमन आणि विकास) कायदा, 1966 च्या कलम 8 चे उल्लंघन करणारा आहे. अश्या आशयाची नोटीस बेळगाव कृषी उत्पन्न बाजार संस्थेच्या सचिवांनी जय किसान भाजी मार्केटला बजावली आहे.
या नोटिसी नंतर मंगळवारी सकाळी जय किसान भाजी मार्केटात कितपत व्यापार सुरु होतो पोलीस व्यपाऱ्यांची अडवणूक करतात का यासह ए पी एम सी मार्केट मध्ये काय परिसथिती असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बेळगाव एपीएमसी सचिवांची जय किसान भाजी मार्केटला बजावली नोटीस
जय किसान भाजी मार्केटात होणारा भाजीपाला व्यापार कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार व्यवसाय (नियमन आणि विकास) कायदा, १९६६ च्या कलम ८ चे उल्लंघन करणारा




