बेळगाव लाईव्ह :बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काल निधन पावलेल्या एका बेवारस वृद्ध हिंदू महिलेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करून मानवता आणि सांप्रदायिक सौहार्दाचे दर्शन घडविले.
सिव्हिल हॉस्पिटल मधील एका बेवारस हिंदू महिलेच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर खद्री गीवाले यांनी सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी त्या महिलेच्या अंत्यसंस्कार यासाठी तातडीने पुढाकार घेतला.
त्यानंतर संबंधित महिलेचे कुटुंब किंवा नातेवाईक नसल्यामुळे सदाशिवनगर स्मशानभूमीत तिच्यावर संपूर्ण हिंदू विधींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे दोन समाजातील मजबूत बंध अधोरेखित झाले. कारण मृत आजीच्या अंत्यसंस्कारासाठी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले होते.




अंत्यसंस्कारा प्रसंगी गंगाधर पाटील, गणेश रोकडे, निसार शमशेर, ॲलन विजय मोरे, दीपक, संजू, हर्ष अमन व त्याचे सहकारी आणि इतर अनेक जण उपस्थित होते.
प्रेम, आदर आणि एकता या गोष्टी धार्मिक सीमा ओलांडू शकतात हे दाखवून देणारी ही घटना शहरात कौतुकाचा विषय झाली आहे.


