बेळगाव लाईव्ह ; इंगळी गावात गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून हुक्केरी तालुक्यातील या पोलिस ठाण्याच्या पीएसआयला एसपींनी निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
पीएसआय निखिल कांबळे असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. मागील जून महिन्याच्या 26 तारखेला, श्री राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी गायी घेऊन जाणारे एक वाहन ताब्यात घेतले आणि ते पोलिस ठाण्यात आणले त्यावेळी कर्तव्यात कसूर केल्यामुळे निखिल कांबळे यांना या घटनेला जबाबदार धरण्यात आले त्यांनी हे प्रकरण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले नाही असा ठपका ठेवण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाचा आदेश जारी करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
श्रीराम सेनेच्या वतीने 3 जुलै रोजी ‘इंगळी चलो’ असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु त्या आधीच सदर घटनेला पीएसआय निखिल कांबळे यांना जबाबदार धरून निलंबित करण्याचे आदेश बेळगावचे एसपीने दिले आहेत .
काल मंगळवारी बेळगावात श्रीराम सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेत पोलिसांवर आरोप करण्यात आला होता त्यानंतर बेळगाव पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी ही कारवाई केली आहे.



