बेळगाव लाईव्ह: अरिहंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बेळगाव, कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथील रुग्णांसाठी एक आशेचे किरण बनले आहे. रुग्णांना उच्च्चदर्जाची, परवडणारी, उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे. या भागात विशेष वैद्यकीय सेवांच्या वाढत्या गरजेला प्रामाणिक प्रतिसाद म्हणून स्थापन झालेले अरिहंत हॉस्पिटल हे केवळ आरोग्यसेवा पुरविण्यासाठी नाही तर करुणा, उत्कृष्टता आणि सामुदायिक काळजीने चालवण्यात येणारे एक ध्येय आहे. अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत अरिहंत हॉस्पिटल रुग्णांसह नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरले असून कोणताही मोठा विकार असो डोळ्यासमोर एकच नाव येते, ते म्हणजे अरिहंत हॉस्पिटल होय.
अरिहंत हॉस्पिटल हे दीक्षित हेल्थकेअर प्रा. लि. चे एक युनिट आहे. मॉड्यूलर ऑपरेटिंग रुम, सुसज्जीत कॅथलॅब, आधुनिक आयसीयू-सीसीयू, आयटीयू व्यवस्था व पंचतारांकित रुग्ण खोल्यांनी सुसज्ज असे १०० बेड्सचे एनएबीएच मान्यतप्राप्त हॉस्पिटल असून सर्वसामान्यांना पायाभूत सुविधा प्रदान करते. नावीन्यपूर्ण व रुग्णांना केंद्रस्थानी ठेवणारे अरिहंत हॉस्पिटल सर्वसामान्यांच्या विश्वासात पात्र ठरत असून वेगाने वाढणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलपैकी एक आहे.
हृदयरोग अन् डॉ. दीक्षित जणू समीकरणच..
डॉ. एम. डी. दीक्षित हे हॉस्पिटलचे एमडी व सीईओ असून त्यांच्या नेतृत्त्वाखाली हॉस्पिटलची यशस्वी घोडदौड सुरू आहे. हृदयरोग म्हटले आपसुकच डोळ्यासमोर एकच नाव येते, ते म्हणजे डॉ. एम. डी. दीक्षित. आपल्या ३३ वर्षांच्या अनुभवातून डॉ. एम. डी. दीक्षित यांनी आतापर्यंत सुमारे ३५ हजारहून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच १० हजारहून अधिक बालकांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत. आर्टेरिअल स्विच ऑपरेशन, फॉन्टन, सेनिंग्स, मीनिमल इन्वेसिव्ह सर्जरी यासारख्या जटिल प्रक्रियांद्वारे डॉ. एम. डी. दीक्षित यांनी हजारो रुग्णांचर हृदय शस्रक्रिया केल्या आहे. ज्यामध्ये ९०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बालकावरही हृदय शस्रक्रिया केली असून ७ महिन्याच्या गरोदर महिलेचीही बायपास सर्जरीदेखील केली आहे. डॉ. एम. डी. दीक्षित हे अमरिकेच्या सोसायटी ऑफ पेडियाट्रिक सर्जन व युरोपियन असोसिएशन ऑफ कार्डियो थॉरासिक सर्जनचे अजीवन सदस्य आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखालीच अरिहंत हॉस्पिटलची यशस्वी अश्वमेध यापुढेही असाच सुरू राहणार असून भविष्यात रुग्णांसाठी नवनवीन उपक्रम राबण्यिात येणार आहेत.
अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांच्याकडून वारसा पुढे
अरिहंत हॉस्टिपलची स्थापना सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) व डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या दूरदृष्टीने करण्यात आली. त्यांचा वारसा युवा उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील पुढे नेत असून सर्वसामान्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने आरोग्यसेवेमध्ये पाऊल टाकले. सहकार, शिक्षण, शेती, कापड व साखर उद्योगाद्वारे सामाजिक कल्याणासाठी अखंडित कार्यरत राहणारे अभिनंदन पाटील व उत्तम पाटील हे डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या साथीने करुणामय वैद्यकीय सेवेच्या ध्येयाला आकार देत आहेत.

विविध सुविधा कार्यरत
अरिहंत अवयव प्रत्यारोपणासाठी मंजूर झालेले एनएबीएच मान्यताप्राप्त हॉस्पिटल आहे. परवाना असलेले रक्त साठवण केंद्र असून अत्याधुनिक मॉड्यूलर ऑपरेश थिएटर आहेत. सुसज्जीत असे कॅथलॅब असून २४ तास सेवा पुरविण्यासाठी सुविधांनीयुक्त हृदयरोग रुग्णवाहिका आहे. हॉस्पिटलमध्ये संशोधन व प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. हॉस्पिटलमध्ये बायपास, हृदयातील झडप बदलणे व दुरुस्त करणे, हृदयाला छिद्र असणे आदी शस्त्रक्रिया, रोबोटिक गुडघा बदले (टीकेआर), बेरियाट्रिक सर्जरी, कार्डिओलॉजी, सीव्हीटीएस, आयडीसीसीएम, डीएनबी, एंडोस्कोपी, ईआरपीसी, सिटीस्कॅन, 24 तास लॅबोरेटरी, अल्ट्रासाऊंड आदी सुविधा कार्यरत आहेत.
हॉस्पिटलमधील कार्यान्वित विभाग
अरिहंत हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, डोळ्यांचे विकार, अवयव प्रत्यारोपण, पोटविकार, किडनी विकार, मूत्रपिंड विकार, ऑर्थोपेडिक, मेंदूविकार, जनरल मेडिसीन व शत्रक्रिया, बेरियाट्रिक आदी विभाग कार्यरत आहे. याद्वारे हजारो रुग्णांवर आतापर्यंत उपचार व शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अरिहंत हॉस्पिटलने दोन वर्षाच्या कालावधीत अनेक अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या असून रुग्णांना नवजीवन दिले आहे. त्यामुळे रुग्णांसह नागरिकांच्या विश्वासात पात्र ठरत असून नागरिक अरिहंत हॉस्टिपलला अधिक पसंदी देत आहेत.
हॉस्पिटलची कामगिरी
अरिहंत हॉस्पिटलने आत्तापर्यंत २८ हजार १४ ओपीडी रुग्णांना सेवा दिली असून १३ हजार १८३ रुग्णांना दाखल करून घेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. सुमारे ४१ हजारहून अधिक रुग्णांना रुग्णसेवा पुरविण्यात आली आहे. हॉस्पिटलने सुमारे ६ हजार ८२० कॅथलॅब प्रक्रिया, २ हजार ३५८ हृदय शस्त्रक्रिया, ६८४ जनरल व मेंदू शस्रक्रिया केल्या आहेत. विशेष सेवांमध्ये १४ टावी प्रक्रिया केल्या आहेत. त्याचबरोबर ३०० ईआरपीसी, १४०० एंडोस्कॉपी, १३५२ डायलेसिस यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत.
विविध सरकारी योजना व खासगी इन्सूरन्स
अरिहंत हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत, आरोग्य कर्नाटक (एबीएआरके) ज्योती संजीवनी, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके). एनडब्ल्यूकेआरटीसी, यशस्विनी या कर्नाटक सरकारच्या, दिनदयाल स्वास्थसेवा योजना (डीडीएसएसके) व गोवा शिपयार्ड लि. या गोव्यातील योजना कार्यान्वित असून केंद्र सरकारची विमानतळ प्राधिकरणाची योजनाही कार्यान्वित आहे. त्याचबरोबर सेफ वे, इरिक्सन, एसबीआय जनरल इन्सूरन्स, चोलमंडलम् एमएस जनरल इन्सूरन्स, दालमिया सिमेंट, ईस्ट वेस्ट असिस्ट इन्सूरन्स, रिलायन्स जनरल इन्सूरन्स, फ्यूचर जनरल इंडिया इन्सूरन्स, निवा बुपा हेल्थ इन्सूरन्स, केअर हेल्थ इन्सूरन्स, हेल्थ इंडिया इन्सूरन्स टीपीए, टाटा एआयजी जनरल इन्सूरन्स, फॅमिली हेल्थ प्लॅन इन्सूरन्स, युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्सूरन्स, इंडस हेल्थ प्लस, आयसीआयसीआय लोंबार्ड स्टार हेल्थ केअर, आदित्य बिर्ला, मणिपाल सीग्ना, गॅलक्सी इन्सूरन्स, हेल्थ इन्सूरन्स टीपीए आदी खासगी इन्सूरन्स कार्यान्वित आहे.



