बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील नंदिहळ्ळी गावातील जागृत देवस्थान कलमेश्वर (शिव )मंदिर अत्यंत जुने मंदिर आहे .त्या मंदिराचे बांधकाम करण्याची नितांत गरज आहे.
तेव्हा धर्मादाय खात्यातून या मंदिरासाठी विशेष निधी मंजूर करावा यासाठी नंदिहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीने महिला व बालविकास खात्याच्या मंत्री .लक्ष्मी हेब्बाळकर यांना सोमवारी देण्यात आले.
कलमेश्वर( शिव) पुरातन मंदिर आहे. मात्र या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला नाही. या मंदिराची पडझड झाली आहे .तेव्हा या मंदिराच्या उभारण्यासाठी किमान 40 लाख रुपयांची गरज आहे असेही मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पुरातन शिव मंदिरासाठी निधी मंजूर करावा या मंदिराचे जीर्णोद्धर करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे करण्यात आली.
यावेळी वकील मारुती कामाण्णाचे, सामाजिक कार्यकर्ते विजय सांबरेकर ,अमित कदम यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी निवेदन स्वीकारले तसेच लवकरात लवकर निधी मंजूर करू असे आश्वासन त्यांनी दिले .


