धामणे माध्यमिक विद्यालयात शाळा सुधारणा शैक्षणिक कार्यक्रम

0
8
 belgaum

बेळगाव लाईव्ह :माध्यमिक विद्यालय शिक्षक आणि पालक संघटना धामणे आणि धामणे (एस) माध्यमिक विद्यालय शाळा सुधारणा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाळा सुधारणा शैक्षणिक कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला.

नवभारत सोसायटी धामणेचे संचालक राजू बाळेकुंद्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर नवभारत सोसायटीचे अध्यक्ष महादेव येळवी, विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी, धामणे ग्रामपंचायत अध्यक्ष पंडित पाटील यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, आर. एन. चौगुले, अंकुश केसरकर, गंगाधर पाटील, रवी बस्तवाडकर, अमर अकनोजी, सोमशेखर सुतार, संतोष चौगुले, श्रवणकुमार हेगडे, बाळू देसुरकर, हेमंत लोकलुचे, अण्णप्पा मराठे, किरण चतुर, वैजनाथ अकनोजी, यल्लाप्पा रेमान्नाचे, अब्दुल किल्लेदार, बसवंत बाळेकुंद्री, श्रीमंतगौडा पाटील, जोतिबा धर्मूचे, आर. एम. तरळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभिक ईशस्तवन व स्वागतगीत झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माध्यमिक विद्यालय धामणे शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण व मातृभाषा शिक्षणाचा विकास यासंदर्भात मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्याचप्रमाणे शाळा इमारत नूतनीकरणासाठी रोख रक्कम जाहीर करून सहकार्य केले. सदर कार्यक्रमास धामणे देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी संघटना, शिक्षणप्रेमी, युवक मंडळं, महिला मंडळं, शाळेचे शिक्षक वर्ग, विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

 belgaum

माध्यमिक विद्यालय धामणे (एस) शाळेच्या इमारतीला गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात गळती लागत आहे. यासाठी शाळा इमारतीचे नूतनीकरण गरजेचे असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कांही आवश्यक मूलभूत गरजांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यासाठी सुमारे 20 लाख रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे.

तरी यासाठी समाज सुधारक, दानशूर व्यक्ती आणि शिक्षण प्रेमींनी शाळा सुधारणा शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहन शाळा सुधारणा समितीने केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी 9341114085, 9743952278, 7406660189 किंवा 9844587910 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.