तलावात बुडाला बैल शेतकऱ्याचे नुकसान

0
2
Ox fallen lake
 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील निलावडे ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत असलेल्या मळव गावातील शेतकरी, गणपती पारसेकर यांचा एक बैल तलावात बुडून मृत्यू पावला आहे. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मळव येथील शेतकरी गणपती पार्सेकर, हे आपली बैल जोडी घेऊन, गावानजीक असलेल्या तलावात, बैल धुण्यासाठी गेले होते. एक बैल त्यांनी तलावा शेजारी असलेल्या दगडाला दोरीने बांधला, तर दुसऱ्या बैलाला तलावात उतरून धूत होते.

नेमके त्याच वेळी बैल उधळला व त्यांने दगडा सकट तलावात उडी घेतली. त्यामुळे बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

 belgaum

याबाबतची माहिती तात्काळ अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बैलाला तलावातून बाहेर काढले. Ox  fallen lake त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पशु संगोपन खात्याच्या वैद्यानी पंचनामा करून उत्तरीय तपासणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.