बेळगाव लाईव्ह — हिवाळ्याचा मौसम सुरू होताच पक्ष्यांच्या स्थलांतराचा निसर्गचक्र पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. बेळगाव तालुक्यातील यदुइराप्पा रोड शेजारील शेतवाडी परिसरात बगळ्यासारख्या दिसणाऱ्या विविध स्थलांतरित पक्ष्यांनी हजेरी लावली असून, शेत ओळीत खाद्य टिपताना हे पक्षी मोठ्या संख्येने दिसत आहेत.
पक्षी हे सर्वाधिक स्थलांतर करणारे जीव म्हणून ओळखले जातात. तापमानातील बदल, अन्नाची उपलब्धता आणिसुरक्षित वातावरणाच्या शोधात हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करत असतात. सध्या बेळगाव परिसरात वाढलेल्या थंडीमुळे बाहेरील देशांतून तसेच इतर भागांतून स्थलांतरित पक्षी येथे दाखल झाल्याचे निरीक्षण निसर्गप्रेमींनी नोंदवले आहे.

निसर्ग आणि पर्यावरण जपण्यासाठी शेतवाडी परिसरातील पाणथळ जागा, झाडे आणि नैसर्गिक अधिवास संरक्षित ठेवण्याची गरज असून, नागरिकांनीही या पक्ष्यांना त्रास न देता त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
बेळगावमधील बी. एस. येडीयुरप्पा रस्त्याशेजारील शेतांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बगळ्यासारखे दिसणाऱ्या स्थलांतरित पक्षांचे थवे खाद्य टिपताना दिसत असून जे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
जाणकारांच्या मते येडीयुरप्पा मार्ग शेजारील शेतांमध्ये दिसून येणारे सदर
पक्षी बहुतेक कॅटल ग्रिट अर्थात गायबगळा असण्याची शक्यता आहे. हे पक्षी बगळ्यासारखे दिसतात आणि भारतात स्थानिक -स्थलांतरित असतात. दक्षिण भारतात हिवाळ्यात मोठ्या संख्येने दिसणारे हे पक्षी उत्तरेकडून येतात किंवा स्थानिक हालचाली करतात. या पक्षांची शेतातील उपस्थिती हवामान बदलाच्या प्रभावाचे संकेत देतात. कर्नाटकात, विशेषतः बेळगाव जिल्ह्यात असे स्थलांतरित पक्षी सामान्य आहेत. पाणी आणि खाद्यामुळे शेती क्षेत्रे पक्षी व प्राण्यांना आकर्षित करतात. त्यामुळे शेतवाडी सारख्या भागात हे पक्षी शेतात येतात. बेळगाव शहराजवळील शेतीत मुबलक प्रमाणात कीटक व अन्न उपलब्ध असल्याने ते कांही काळ इथेच थांबतात. त्या अनुषंगाने सध्या बगळ्या प्रमाणे दिसणाऱ्या पक्षांचे मोठे थवे बेळगाव शहराजवळील शेतांमध्ये खाद्य टिपताना दिसत असून जे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.




