belgaum

आं. रा. पुरस्कार विजेत्या मेश प्रदर्शनाला बेळगावात उस्फुर्त प्रतिसाद

0
477
 belgaum

बेळगाव लाईव्ह :विशेष जीवनशैली उत्पादनांसाठी सुप्रसिद्ध असलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे ‘मेश प्रदर्शन’ सध्या बेळगावमध्य सुरू असून दर्जेदार उत्पादनामुळे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

बेळगाव शहरातील खानापूर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मराठा मंदिर येथे कालपासून सलग तीन दिवस मेश प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी लोकप्रिय झालेले हे प्रदर्शन स्थानिक रहिवाशांच्या मागणी वरून बेळगावमध्ये प्रथमच भरवण्यात आले आहे.

काल शुक्रवारपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनामध्ये सुमारे 65 स्टॉल उभारण्यात आले असून हे सर्व स्टॉल महाराष्ट्रातील विविध शहरांमधून आलेल्या व्यावसायिकांनी उभारले आहेत. स्त्री-पुरुषांचे विविध प्रकारचे रेडिमेट कपडे, महिलांसाठी आकर्षक व्हरायटी साड्या यासारख्या वस्त्रप्रावरणांसह दैनंदिन गरजेच्या वस्तू, गृहपयोगी साहित्य वगैरे विशेष जीवनशैली उत्पादनांची मेश प्रदर्शनात रेलचेल आहे. त्यामुळे प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर ग्राहकांची गर्दी पहावयास मिळत आहे.

 belgaum

मेश प्रदर्शनाच्या आयोजक मेधा दिवेकर यांनी आज शनिवारी सकाळी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले की मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये गेल्यानंतर आता मेश प्रदर्शनातील सहभागींना घेऊन मी बेळगावमध्ये आली आहे. मी ज्या ज्या वेळी सोशल मीडियावर लाईव्ह जाते त्या त्यावेळी बेळगावातील लोक ‘तुम्ही बेळगावला कधी येणार?’ अशी विचारना माझ्याकडे करत होते.

शेवटी ‘मेश’ बेळगावमध्ये दाखल झाले आहे जे खास जीवनशैली उत्पादनांसाठी सुप्रसिद्ध आहे. आमच्या या प्रदर्शनात उपलब्ध असणारी उत्पादने ग्राहकांना बाजारपेठेत मिळणार नाहीत. विशेष म्हणजे मेश प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यामुळे काल 10 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि उद्या 12 एप्रिलला समाप्त होणाऱ्या या प्रदर्शनाचा बेळगाव शहरवासियांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मेधा दिवेकर यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.