belgaum

खानापूरची कन्या कर्नाटक हॉकी संघात!

0
955
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याची कन्या समीक्षा गुरव हिने हॉकी क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत कर्नाटक राज्य संघात स्थान मिळवले आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेत ती कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार असून, जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

महाराष्ट्रातील पुणे येथे १६ वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ ही स्पर्धा २९ एप्रिल ते १० मे दरम्यान होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी कर्नाटक संघात फॉरवर्ड खेळाडू म्हणून प्रतीक्षा गुरवची निवड झाली आहे.

बेंगळूर येथे नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तिने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. तिच्या वेगवान खेळ, आक्रमक शैली आणि गोल करण्याच्या क्षमतेमुळे तिला संघात स्थान मिळाले आहे.

 belgaum

प्रतिक्षा ही खानापूर तालुक्यातील निट्टूर गावची रहिवासी असून, बेळगाव येथील लेले मैदानावर ती नियमित सराव करते. तिला प्रशिक्षक उत्तम शिंदे आणि सुधाकर चाळके यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच हॉकी बेळगाव संस्थेचेही तिला सतत पाठबळ मिळाले आहे.

मागील वर्षी खानापूर तालुक्यातील मराठा मंडळ शाळेच्या चार विद्यार्थिनींची मैसूर येथील हॉकी होस्टेलमध्ये निवड झाली होती. त्यानंतर आता समीक्षा गुरवची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने खानापूर तालुक्यातील मुलींची हॉकीमधील कामगिरी पुन्हा अधोरेखित झाली आहे.

राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून प्रतीक्षा गुरव कर्नाटकसह बेळगावचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.