belgaum

बेळगाव–तिरुचिनापल्ली थेट रेल्वे लवकरच; प्रवाशांसाठी मोठी सोय

0
316
Indian railway
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगावहून तिरुचिनापल्ली येथे थेट प्रवास करण्यासाठी लवकरच नवीन रेल्वे सेवा सुरू होणार आहे. नैऋत्य रेल्वेकडून या विशेष रेल्वेचे नियोजन करण्यात आले असून, प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

रेल्वे क्रमांक 17075/17076 ही गाडी शनिवारी तिरुचिनापल्लीहून सुटून रविवारी बेळगावमध्ये दाखल होणार आहे. या गाडीचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

 belgaum

या मार्गावर बळ्ळारी, हुबळी, गदग, धारवाड आणि लोंढा या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. सध्या बेळगावला हमसफर एक्सप्रेस (क्र. 22497) बुधवारी दुपारी 2.50 वाजता येते, तर बेळंकवी एक्सप्रेस (क्र. 17315) सकाळी 11.50 वाजता येते.

आतापर्यंत बेळगावहून तिरुचिनापल्लीसाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र, नव्या रेल्वेमुळे प्रवाशांचा वेळ आणि प्रवास अधिक सुलभ होणार असून, या सेवेचा मोठा लाभ होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.