belgaum

बसवेश्वर सहकारी पतसंस्थेत घोटाळा?

0
668
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील श्री बसवेश्वर विविधोद्देशीय सौहार्द सहकारी सोसायटीच्या अध्यक्ष आणि संचालकांनी ठेवीदारांच्या १०० कोटींहून अधिक रकमेची लूट केल्याचा आरोप करत शनिवारी गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने केली. कष्टाची पुंजी अडकल्याने हवालदिल झालेल्या नागरिकांनी दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

बसवेश्वर सहकारी सोसायटीत ठेवी ठेवणाऱ्या हजारो गुंतवणूकदारांना आता आपल्याच हक्काच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सोसायटीचे अध्यक्ष राजनगौडा रावसाहेब पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी ठेवींची मुदत संपूनही परतावा न दिल्याने ही मोठी आर्थिक फसवणूक समोर आली असून ठेवीदारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी अनेक गुंतवणूकदारांनी बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरून ठेवीदारांच्या बाजूने निकाल देत पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या कायदेशीर आदेशांना न जुमानता संशयित आरोपी सध्या फरार झाले आहेत. न्यायालयाने फौजदारी गुन्हा क्रमांक ४०४ आणि २३ अंतर्गत चिकोडी व एपीएमसी पोलीस ठाण्याला आरोपींना जेरबंद करून हजर करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.

 belgaum

गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस यंत्रणा आरोपींचा शोध घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असून, “आरोपी उपलब्ध नाहीत” असा त्रोटक अहवाल न्यायालयात सादर केला जात आहे. पोलिसांच्या या संशयास्पद कार्यपद्धतीची न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या चिकोडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, पोलिसांच्या दिरंगाई विरोधात ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

या आंदोलनावेळी एन. आर. लातूर, ज्योती पाटील, रूपेश लातूर, शीतल बिलावर, काजल नायक, कीर्ती कांबळे, सुभाष बागेवाडी यांच्यासह शेकडो फसवणूक झालेले ठेवीदार उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.