belgaum

‘त्या’ 15.45 कोटींच्या सायबर फसवणुकी प्रकरणी दोघांना अटक

0
634
Cen police station
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सावरकर रोड, टिळकवाडी, बेळगाव येथे डिजिटल अरेस्ट माध्यमातून घडलेल्या तब्बल 15.45 कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणी बेळगाव शहर सायबर गुन्हे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.

सायबर पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे व्यंकदूत शरत नाईक, वडील राजू नाईक (रा. गच्चीबोली, हॉस्टेल हैदराबाद) आणि देगावत श्रीपाद नाईक, वडील देगावत मंगल नाईक (रा. शिवदुर्गनगर हैदराबाद) अशी आहेत.

या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, बेळगाव शहर सायबर गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये गेल्या 18 मार्च 2026 रोजी दाखल झालेल्या डिजिटल अरेस्ट सायबर प्रकरणात फिर्यादी अजित गोपाळकृष्ण सराफ (रा. आगरकर रोड, टिळकवाडी बेळगाव) यांना सायबर गुन्हेगाराने आपण के. सुब्रमण्यम, डायरेक्टर ऑफ सीबीआय असल्याची बतावणी केली. तसेच तुमच्या नावावर दोन सिम कार्ड ऍक्टिव्ह होते. तुम्ही नरेश गोयल जेट एअरवेज कंपनीचे सीईओ यांच्याशी संपर्कात होतात असे सांगून सध्या आम्ही नरेश गोयल यांना अटक केली आहे.

 belgaum

तपासामध्ये तुम्ही नरेश गोयल यांना तुमच्या कॅनरा बँक खात्यामधून 25 लाख रुपये मनी लॉन्ड्रींग करून 5 लाख रुपयांचे कमिशन मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सदर प्रकरणात तुम्ही देखील आरोपी आहात. आम्हाला तपासात तुमचे सहकार्य अपेक्षित असून जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्हाला देखील तात्काळ अटक केली जाईल असे सराफ यांना धमकावण्यात आले. त्यानंतर अजित सराफ यांच्याकडून 7 फेब्रुवारी 2026 पासून ते 9 मार्च 2026 पर्यंत एकूण 15 कोटी 45 लाख आरटीजीएस माध्यमातून लुबाडण्यात आले.

Cen police station

याप्रकरणी बेळगाव शहर सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगाने तपासाची चक्रे फिरवण्यात आली. फिर्याददारांकडून त्यांनी हस्तांतरित केलेल्या पैशाबद्दल माहिती घेण्यात आली. त्या आधारे आरोपी व्यंकदूत व देवागत हे दोघे जण जंटी इंडस इंड बँकेच्या चालू खात्यात गेल्या 9 फेब्रुवारी 2026 रोजी 2 कोटी रुपये हस्तांतरित करताना सापडले.

त्यामुळे त्या दोघांना गेल्या सोमवारी तेलंगणा येथे अटक करून काल मंगळवारी 7 एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सायबर गुन्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त बी. एस. मंटूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त अटकेची कारवाई केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.