belgaum

दहावी परीक्षा केंद्रांच्या पारदर्शकतेसाठी ‘ही’ नवी ऑनलाइन प्रणाली

0
547
Bgm sslc exam
 belgaum

बेळगाव लाईव्ह :दहावीच्या परीक्षा केंद्रांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या प्रमुखांसाठी नवीन ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली असून यासंदर्भात कर्नाटक परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सविस्तर मार्गदर्शक सूची जारी केली आहे.

सदर नवी ऑनलाइन प्रणाली गेल्या 9 मार्चपासून परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार परीक्षा केंद्रांचे मुख्य अधीक्षक मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून विद्यार्थ्यांची माहिती, प्रश्नपत्रिका तपशील, उत्तर पत्रिका वापर, हजेरी नोंद तसेच परीक्षा केंद्राच्या खर्चाचा तपशील भरू शकणार आहेत.

यासाठी केंद्रप्रमुखांना एसएमएसद्वारे यूजर आयडी व पासवर्ड मिळणार असून प्रथम लॉगिन केल्यानंतर पासवर्ड बदलणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरच सर्व माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. नवीन प्रणालीमध्ये परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे सीएनआर आणि एएमएल डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

 belgaum

तसेच नवीन नोंदणी विषय किंवा माध्यमातून बदल, छायाचित्र दुरुस्ती इत्यादी झाल्यास सुधारित सीएनआर-एएमएल यादीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. यावर्षी परीक्षेसाठी तीन प्रकारच्या उत्तर पत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार असून केंद्रप्रमुखांनी प्राप्त झालेल्या वापरलेल्या आणि शिल्लक उत्तर पत्रिकांची सविस्तर माहिती पोर्टलवर नोंदवणे अनिवार्य असणार आहे.

याच माहितीच्या आधारे पुढील प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिकांचा पुरवठा निश्चित केला जाणार आहे. प्रश्नपत्रिकांच्या भाषा नुसार आणि विषयानुसार उपलब्ध असलेल्या आवृत्तीच्या माहितीमध्ये कोणतीही विसंगती आढळल्यास मंडळाच्या संगणक विभागाला कळविणे आवश्यक आहे. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन पद्धतीने नोंदवावी लागणार आहे.

प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपोआप हजर दाखविले जाईल. केवळ गैरहजर किंवा गैरप्रकारात सहभागी विद्यार्थ्यांची नोंद केंद्रप्रमुखांना करावी लागेल. हजेरी नोंद पूर्ण झाल्यानंतर त्यात पुन्हा बदल करता येणार नाही. यंदा परीक्षा कामकाजात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन डीबीटी पद्धतीने थेट त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याचेही कर्नाटक परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.