belgaum

बेळगावात इंधन टंचाई नाही; घाबरून खरेदी टाळा – पोलीस आयुक्तांचे आवाहन

0
563
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरात पेट्रोल पंपांवर वाढलेली गर्दी ही इंधन टंचाईमुळे नसून नागरिकांकडून होत असलेल्या ‘पॅनिक बायिंग’मुळे आहे, असे स्पष्ट करत पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

मागील रात्रीपासून शहरातील विविध पेट्रोल पंपांवर असामान्य गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शहरात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पोलीस आयुक्तांनी नागरिकांना घाबरून अनावश्यक खरेदी करू नये, असे सांगितले असून, अशा कृतीमुळे पुरवठा व्यवस्थेवर ताण येऊन गैरसोय निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच, पेट्रोलियम कायदा 1934 व पेट्रोलियम नियम 2002 अंतर्गत प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल विक्रीस कडक बंदी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व पेट्रोल पंप मालकांना याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

 belgaum

नागरिकांनी पेट्रोल पंपांवर शिस्त पाळावी, पंप कर्मचाऱ्यांशी सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.