belgaum

जयदीपने मारले मैदानमुतगा कुस्ती मैदान

0
191
 belgaum

बेळगाव लाईव्ह : श्री हनुमान यात्रेनिमित्त मुतगे येथील हनुमान कुस्ती संघटना आणि गावकऱ्यांतर्फे दमनी तलावात आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात कोल्हापूर गंगावेस तालमीचा उदयोन्मुख मल्ल जयदीप पाटील याने इराणचा आंतरराष्ट्रीय पैलवान इरफानला अस्मान दाखवत मैदान मारले. या मैदानात 60 हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. काटा-कुस्त्या झाल्याने उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

पै. जयदीप पाटील आणि इराणचा पैलवान इरफान यांच्यातील प्रमुख कुस्ती ग्रामपंचायत, ग्राम सुधारणा मंडळ, देवस्थान कमिटी यांच्या हस्ते लावण्यात आली. दोन्ही पैलवानांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत आक्रमक कुस्ती केली. डाव-प्रतिडावांनी रंगलेली ही कुस्ती उपस्थितांची दाद मिळवून गेली. शेवटी 26 व्या मिनिटाला जयदीपने इरफानचा पराभव केला.

या मैदानात दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सचिन ठोंबरेने पंजाबच्या गोगीसिंगवर विजय संपादन केला. नेपाळचा देवा थापा याची मनोरंजनात्मक कुस्ती झाली. उपस्थित प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली.

 belgaum

तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत दिल्लीच्या करणने शिवा दड्डीला ‘कोंदण एकचाक’ डावावर अवघ्या एका मिनिटात अस्मान दाखवले. पृथ्वीराज (कंग्राळी) वि. सनि कुसाळे, विनायक (येळ्ळूर) वि. आर्यन (कोल्हापूर), महेश (तीर्थकुंडे) वि. तेजस (राशिवडे), हर्ष (कंग्राळी) वि. पंकज (चापगाव) यांच्यातील कुस्त्या बरोबरीत सुटल्या.

सातव्या कुस्तीत भूमिपुत्र (मुतगा) याने अनिल (चिकोडी) याला चितपट केले. दहाव्या कुस्तीत दादा कोळेकरने ‘हप्ता’ डावावर आयुष (दिल्ली) याला पराभूत केले.

भरत (मुतगे), श्री घाडी, ध्रुव (मणिकेरी), करण (खादरवाडी), नचिकेत (रणकुंडये), प्रथमेश पावशे, श्रीनंद (निलजी), देवा (येळ्ळूर), समर्थ (हिंडलगा), रिद्धांत (मजगाव), आर्यन (मुचंडी), स्वराज (मुचंडी), पृथ्वीराज (अवचारहट्टी), रोहन (येळ्ळूर), रितेश (धामणे), नागेश (येळ्ळूर), स्वप्निल (सावगाव) यांनी विजय संपादन केले.

पंच म्हणून नवीन पाटील, भावकांना पाटील, हणमंत पाटील, पै. श्रीकांत, विलास पाटील, चेतन बुद्धन्नावर, नितीन चिंगळे, अतुल शिरोळे, सुहास पाटील, भरमा गोमान्नाचे, नितीन बिरादार आदींनी काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.