बेळगाव लाईव्ह :
गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव शहरात पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी पेट्रोल पंप मालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि उपायुक्त एन. व्ही. बरमनी यांनी या बैठकीत उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत मार्गदर्शक सूचना दिल्या.
बैठकीत खालील महत्त्वाचे निर्णय व सूचना देण्यात आल्या:
- सर्व पेट्रोल पंपांवर “पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, घाबरून खरेदी करू नका” असे फलक लावण्याचे निर्देश.
- सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने बाटल्या किंवा कॅनमध्ये पेट्रोल देण्यास सक्त मनाई.
- पंपावर कोणतीही गर्दी किंवा गोंधळ निर्माण झाल्यास त्वरित 112 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सूचना.
- पोलीसांची ‘होयसळा’ व पेट्रोलिंग वाहने 24 तास पेट्रोल पंपांच्या मदतीसाठी तैनात राहणार.
पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आणि आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.





