belgaum

धारवाड येथे उद्या ‘मिडिया फेस्ट -2026’ चे आयोजन

0
110
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि समूह संवाद विभागातर्फे माहिती व प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने उद्या सोमवार दि. 9 आणि मंगळवार दि. 10 मार्च 2026 रोजी धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या कनक अध्ययन पिठाच्या सभागृहात मिडीया फेस्ट अर्थात ‘प्रसारमाध्यम उत्सव -2026’ चे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सदर उत्सवाच्या उद्घाटन समारंभास उद्घाटक म्हणून कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए. एम. खान उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून हुबळीच्या कर्नाटक इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश नुली आणि बेळगाव न्यूज फर्स्ट वार्ताहर श्रीकांत कुबकड्डी हे हजर असतील. मिडीया फेस्ट या उत्सवांतर्गत धारवाड व बेळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

 belgaum

ज्यामध्ये वृत्तसंहिता लेखन, रेडिओ जॉकी, मोबाईल जर्नालिझम वगैरे स्पर्धांचा समावेश असणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे प्रशस्तीपत्रासह रोख बक्षीस दिले जाणार आहे.

याव्यतिरिक्त मीडिया फेस्ट -2026 अंतर्गत कनक अध्ययन पिठाच्या सभागृहात मंगळवार दि. 10 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता चर्चासत्र आणि त्यानंतर सकाळी 11:30 वाजता ज्येष्ठ पत्रकार सुभाष हुगार यांचे ‘पत्रकारिता आणि नवतंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उत्सवाचा सांगता समारंभ मंगळवारी दुपारी 2:30 वाजता होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.