belgaum

मटका आणि ड्रग्ज अड्ड्यांवर छापा मच्छे परिसरात कारवाई

0
281
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने मच्छे आणि पिरनवाडी परिसरात विशेष मोहीम राबवून मटका जुगार खेळणाऱ्या एकासह अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांनी संबंधित आरोपींवर कायदेशीर गुन्हे दाखल केले आहेत.

मच्छे इंडस्ट्रियल एरियामधील सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळवत असल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी विनायक बाळाराम पाटील (रा. बाळगमट्टी) आणि रामप्पा कब्बन्ना चौगुला यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मटका साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसऱ्या एका कारवाईत, मच्छे ग्रामपंचायत हद्दीत संशयास्पद रित्या वावरणाऱ्या रोहित बसवराज मुतगेकर (रा. पिरनवाडी ) आणि प्रकाश निरुपदी जकबाळ (रा. पिरनवाडी ) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी गांजासारख्या अमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी आणि संतोष दळवाई यांनी या आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ (बी) नुसार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

 belgaum

या तिन्ही प्रकरणांमध्ये एकूण चार आरोपींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी विशेष प्रशंसा केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.