belgaum

बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसह 5 अधिकाऱ्यांविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार

0
1037
D c office
Dc office file
 belgaum

बेळगाव लाईव्ह :उत्तर कर्नाटक भागामध्ये ट्रॅक्टरसह इतर वाहनांवर बसवल्या जाणाऱ्या अनाधिकृत डीजे साऊंड सिस्टीमवर कारवाई करून त्यावर बंदी घालावी, या आपल्या मागणीकडे गेल्या चार महिन्यांपासून संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बेळगाव जिल्ह्यातील सामाजिक आंदोलक श्रीनिवासगौड बा. पाटील यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसह 5 अधिकाऱ्यांविरुद्ध कर्नाटक लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

कानठळ्या बसवणाऱ्या डीजे साऊंड सिस्टिममुळे विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध नागरिक आणि रुग्णांना प्रचंड त्रास होत आहे. सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन शांततेचा भंग होत आहे. एवढेच नाही तर कांही गंभीर अपघातांना डीजेचा दणदणाट कारणीभूत ठरला असल्याचा आरोप श्रीनिवासगौड पाटील यांनी केला आहे.

तसेच ट्रॅक्टर व अन्य वाहनांवर बसवल्या जाणाऱ्या डीजे सिस्टीमच्या विरोधात तक्रार करून त्यावर बंदी घालावी अशी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करून देखील अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

 belgaum

श्रीनिवासगौड पाटील यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे, त्यामध्ये योगीश ए. एम. (परिवहन आयुक्त बेंगलोर), के. टी. हालस्वामी (अतिरिक्त आयुक्त धारवाड), सिद्धाप्पा कल्लेर (संयुक्त परिवहन आयुक्त बेळगाव), मोहम्मद रोशन (जिल्हाधिकारी बेळगाव)

आणि बसवराज बागल (सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रामदुर्ग) यांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.