बेळगाव लाईव्ह : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. तुमकुरमधील घरगुती पीएनजी पुरवठा करणाऱ्या ‘मेघा सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन प्रायव्हेट लिमिटेड’ने गॅस दरात वाढ जाहीर केली असून, उद्यापासून ग्राहकांना महागडा गॅस खरेदी करावा लागणार आहे.
आखाती देशांतील युद्धामुळे नैसर्गिक वायूच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून, जागतिक स्तरावर इंधन आणि गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर, मेघा गॅस कंपनीने आपल्या दरात सुधारणा केली आहे. नवीन दरपत्रकानुसार, घरगुती पीएनजीची किंमत आता ५२.५० रुपये प्रति एससीएम (सर्व करांसह) निश्चित करण्यात आली आहे. हे सुधारित दर २१ मार्च २०२६ पासून प्रभावी ठरणार आहेत.
तुमकुर भौगोलिक क्षेत्रातील सर्व घरगुती ग्राहकांना या नवीन दरवाढीचा फटका बसणार आहे.
पीएनजी कनेक्शन, बिलिंग किंवा इतर कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी ग्राहक कंपनीच्या १८०० १२३ १८०३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी www.meghagas.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.





