बेळगाव लाईव्ह :गणेबैल टोल प्रकरणात अखेर मोठा निर्णय घेण्यात आला असून टोल चालवणाऱ्या कंपनीचा करार (टर्मिनेशन) रद्द करण्यात आला आहे. लवकरच नवीन टेंडर प्रक्रिया राबवून टोल संचालन नव्या कंपनीकडे सोपवण्यात येणार आहे.
🔹 महत्त्वपूर्ण बैठक पार
या संदर्भात बेळगाव येथील एसी कार्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस एसी श्रवण नाईक, NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर भुवनेश कुमार शुक्ला, काँग्रेस नेते प्रसाद पाटील तसेच टोल कर्मचाऱ्यांचे वकील उपस्थित होते.
🔹 कंपनीला दिले होते निर्देश, पण दुर्लक्ष
बैठकीत टोल प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली.
टोल सुरू ठेवण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित कंपनीला स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, कंपनीच्या प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती प्रसाद पाटील यांनी दिली.
🔹 नवीन टेंडर प्रक्रिया लवकरच
NHAI अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की,
- लवकरच नवीन टेंडर प्रक्रिया राबवली जाईल
- नवीन कंपनीमार्फत टोल संचालन सुरू केले जाईल
- तोपर्यंत टोल ‘ऑटो मोड’मध्ये सुरू ठेवण्याची शक्यता आहे
🔹 स्थानिक कर्मचाऱ्यांना दिलासा
बैठकीत स्थानिक भूमिपुत्र टोल कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला.
नवीन कंपनीमार्फत त्यांना पुन्हा नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔹 काँग्रेसची ठाम भूमिका
खानापूर ब्लॉक काँग्रेसने या प्रकरणात टोल कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तालुक्यात कोणावरही अन्याय झाल्यास त्याविरोधात लढा देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
🔹 भाजपवर टीका
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते आणि संबंधित संघटना गप्प असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली.
सुमारे 40 युवक-युवतींच्या नोकऱ्या धोक्यात असतानाही कोणतीही भूमिका न घेणे आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.
🔹 नागरिकांना टोलमुक्तीचा लाभ
गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नागरिकांना टोलमुक्तीचा सरसकट लाभ मिळत आहे.
यापूर्वी मर्यादित व्यक्तींनाच मिळणारा हा लाभ आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.





