belgaum

बेळगावमध्ये ग्रीव्हज ‘मॅग्नस जी मॅक्स’ इलेक्ट्रिक स्कूटरला मोठी पसंती

0
517
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या कॉलेज रोडवरील यश ऑटो शोरूममध्ये ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या ‘मॅग्नस जी मॅक्स’ या अत्याधुनिक इलेक्ट्रिक दुचाकीचे दिमाखात अनावरण करण्यात आले. १६५ वर्षांची विश्वासार्ह परंपरा आणि 17 वर्षाचा इलेक्ट्रिक स्कूटर मोबिलिटीमधील मॅन्युफॅक्चरिंग चा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कंपनीची ही ‘मेक इन इंडिया’ स्कूटर बेळगावकरांच्या पसंतीस उतरली आहे.

मॅग्नस जी मॅक्स ही स्कूटर सुरक्षितता, दमदार परफॉर्मन्स आणि अत्यल्प खर्च यांचा उत्कृष्ट संगम असल्याचे यश ऑटो शोरूमचे संचालक संजय मोरे यांनी म्हटले आहे. ही स्कूटर प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असून ग्राहकांसाठी किफायतशीर ठरेल, असा विश्वास संजय मोरे यांनी व्यक्त केला.

या मॉडेलमध्ये ३ किलोवॅट क्षमतेची प्रगत लिथियम फेरो फॉस्फेट (LFP) बॅटरी देण्यात आली असून ती एका चार्जवर १४२ किमीपर्यंतची रेंज देते. ३३ लिटरचे प्रशस्त स्टोरेज, ३.५ इंचाचा एलसीडी डिजिटल डिस्प्ले, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि तीन रायडिंग मोड्स यांसारखी वैशिष्ट्ये यात आहेत.

 belgaum

ही गाडी ९४,९९९ रुपये (एक्स-शोरूम) या स्पर्धात्मक दरात उपलब्ध असून कंपनीकडून ५ वर्षे किंवा ७५,००० किमीपर्यंतची वॉरंटी दिली जात आहे. सुरक्षित बॅटरी आणि कमी देखभाल खर्चामुळे हा एक आदर्श पर्याय असल्याचे संजय मोरे यांनी सांगितले.

सणासुदीच्या निमित्ताने बेळगावकरांनी प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी या स्कूटरचे बुकिंग करावे, असे आवाहन यश ऑटोच्या वतीने करण्यात आले आहे. ही गाडी बेळगावसह अथणी, चिकोडी, गोकाक, बैलहोंगल, मुधोळ, निपाणी आणि सौंदत्ती येथील शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.