belgaum

जमीन संपादन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक; शेतकरी-ग्रामस्थांशी चर्चा

0
176
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकासकामांसाठी होणाऱ्या जमीन संपादन प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांसह बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाड गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.


बैठकीत विविध प्रकल्पांच्या कामांची प्रगती तसेच जमीन संपादन प्रक्रियेबाबत आढावा घेण्यात आला. विशेषतः बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत सुरू असलेली कामे, विजापूर-संकेश्वर (गोटूर) एनएच-548 बी तिसरा पॅकेज, बेळगाव-हुलकुंद-रायचूर रस्ता, बेळगाव रिंग रोड आणि बेळगाव विमानतळ या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


अन्य एका बैठकीत विविध प्रकल्पांमुळे प्रभावित होणाऱ्या जमिनींच्या संपादन प्रक्रियेत शेतकरी आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच विकासकामे गतीने पूर्ण व्हावीत आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

 belgaum


बैठकी दरम्यान संती बस्तवाड गावातील शेतकरी व नागरिकांनीही आपल्या समस्या आणि मागण्या मांडल्या. प्रशासनाकडून त्यांची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.