belgaum

गॅस दरवाढीविरोधात बेळगावात महिला काँग्रेसची निदर्शन

0
821
 belgaum

बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या वतीने बेळगावमध्ये निदर्शने करण्यात आली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही दरवाढ लागू केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरटीओ चौकात एकत्र येत आपला विरोध दर्शवला.

बेळगाव शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी रिकामे गॅस सिलेंडर समोर ठेवून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

महिला दिनीच गॅसचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. केंद्र सरकारने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा आगामी काळात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

 belgaum

गॅस दरवाढीचा फटका केवळ गृहिणींनाच नाही, तर मध्यमवर्गीय आणि हॉटेल व्यावसायिकांनाही बसत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. केंद्र सरकारची धोरणे सर्वसामान्यांच्या हिताची नसून, वाढत्या महागाईमुळे जनता अडचणीत आली आहे, अशी टीका ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी केली.

या निदर्शनामध्ये महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. गॅस दरवाढीचा प्रश्न राज्यभर चर्चेत असताना, बेळगावातील हे आंदोलन केवळ काँग्रेस भवनाच्या परिसरापुरतेच मर्यादित राहिल्याचे पाहायला मिळाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.