belgaum

बेळगाव व कलबुर्गी न्यायालयात बॉम्ब धमकीमुळे खळबळ

0
90
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव आणि कलबुर्गी जिल्हा न्यायालयात ई-मेलद्वारे बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली होती.मंगळवारी सकाळी होळीच्या उत्साहात न्यायालय परिसरात हा ई-मेल मिळाल्याने वकील आणि न्यायाधीश तातडीने कोर्टाबाहेर पडले होते.

बेळगाव शहर पोलीस या वेळी तात्काळ कोर्ट परिसरात दाखल झाले. बॉम्ब शोध श्वानांसह संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली. या काळात कोर्टात भीतीचे वातावरण पसरले होते.
पोलिसांच्या तपासणीनंतर न्यायालयात पुन्हा कार्यवाही सुरू झाली आणि वकील, न्यायाधीश व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.


बेळगाव शहर पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमनी यांनी स्वतः धाव घेत कोर्ट परिसराचे पाहणी केली. तसेच कलबुर्गी न्यायालयात देखील अशाच धमकीमुळे परिसर पूर्णपणे पिंजून काढण्यात आला. न्यायाधीशांनी ई-मेलची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्वरित फौज फाटा कोर्ट परिसरात हजर करण्यात आला.

 belgaum

गेल्या काही महिन्यापूर्वी हुबळी कोर्टात देखील असा धमकीचा निनावी फोन ईमेल आला होता. बेळगाव आणि कलबुर्गी कोर्टाचा प्रकरणाचा देखील पोलीस तपास करत असून, धमकी पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.