belgaum

काँग्रेसकडून मुस्लिम समाजावर अन्याय नाही : आसिफ सेठ

0
464
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू आणि हुबळी-धारवाड येथे निगम मंडळाच्या अध्यक्षपदावर मुस्लिम व्यक्तींची नियुक्ती झालेली असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसकडून मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा स्पष्ट निर्वाळा बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी दिला.

खंजर गल्ली येथील कार्यक्रमात स्थानिक पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, भविष्यात बेळगाव जिल्ह्यासाठी देखील काँग्रेसकडून मुस्लिम समाजातील व्यक्तीला महत्त्वाचे पद देण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

लक्ष्मणराव चिंगळे यांसारख्या चिकोडीतील नेत्यांना बुडास अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कारभार देण्यात आला; मात्र मुस्लिम समाजाला यातून डावलण्यात आले आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सेठ यांनी वरील उत्तर दिले.

 belgaum

दरम्यान, आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते खंजर गल्ली येथे नवीन शासकीय दवाखान्याच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या दवाखान्यामुळे परिसरातील नागरिकांना सहज आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून, किरकोळ उपचारांसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार आहे.

ही योजना आमदारांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचा भाग असून, प्राथमिक आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही आमदारांनी दिली.

भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह नगरसेवक उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आमदारांचे आभार मानले. खंजर गल्ली परिसरासाठी हा दवाखाना अत्यंत गरजेचा असल्याने या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.