belgaum

जागतिक कुस्ती मानांकन स्पर्धेत बेळगावच्या प्रशिक्षकाची छाप

0
205
ram pawar
 belgaum

बेळगाव लाईव्ह : झाग्रेब (क्रोएशिया) येथे सुरू असलेल्या पहिल्या जागतिक कुस्ती मानांकन (रँकिंग) स्पर्धेमध्ये भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक बेळगावचे रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

झाग्रेब येथील जागतिक कुस्ती मानांकनस्पर्धेमध्ये काल बुधवारी फ्री स्टाईल प्रकारात भारतीय संघातील 9 मल्लांनी सहभाग दर्शवला होता. त्यापैकी 65 किलो वजनी गटात सुजित याने सुवर्ण पदक पटकावले.तसेच ऑलिंपिक पदक विजेता अमन सेहरावत याने 61 किलो गटात रौप्य पदक आणि अभिमन्यू याने 70 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळविले.

सदर स्पर्धेत भारतीय मल्लांची उल्लेखनीय कामगिरी सुरूच असून उपरोक्त यशस्वी मल्लांना भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक बेळगावचे रामचंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
पवार हे मूळचे चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावचे रहिवासी असून सध्या बेळगाव येथील मराठा सेंटरमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत आहेत.

 belgaum
ram pawar

अमन सेहरावात सारखयाकुस्तीत ऑलंपिक पदक विजेत्या खेळाडूला बेळगावच्या रामचंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले आहे हे बेळगावला निश्चित अभिमानाची बाब आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.