belgaum

कौटुंबिक कलहातून इसमाची किल्ला तलावात आत्महत्या

0
358
 belgaum

बेळगाव लाईव्ह : घरातील कौटुंबिक कलहाला कंटाळलेल्या एका इसमाने बेळगाव किल्ला तलावामध्ये उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव सुभाष हलगेकर (वय 32, रा. घाडी कॉलनी, शहापूर बेळगाव) असे आहे. तो बेळगाव महानगरपालिकेत पौरकार्मिक म्हणून नुकताच नोकरीत कायम झाला होता. त्याचे त्याचे आणि त्याच्या पत्नीचे सतत भांडण होत होते.

घरातील सततच्या भांडणामुळे त्याची पत्नी घर सोडून माहेरी गेली होती. पत्नी तिच्या गावी गेल्या नंतर गेल्या दोन दिवसांपासून सुभाष बेपत्ता झाला होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार देखील शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी सुभाष हलगेकर याचा मृतदेह किल्ला तलावामध्ये तरंगताना आढळून आला. मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

पोलिसांनी अग्निशामक जवानांच्या मदतीने मृतदेह तलावा बाहेर काढून पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडण्यात आला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.