belgaum

बेळगावात 12 फेब्रुवारीपासून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

0
298
cricket
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव उत्तरचे भाजप नेते तसेच एमपी फाउंडेशनचे संस्थापक ॲड. मुरगेंद्रगौडा एस. पाटील यांच्या पुढाकारातून आणि श्री स्पोर्ट्स, खडक गल्ली यांच्या वतीने येत्या गुरुवार दि. 12 ते रविवार दि. 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत बेळगावमधील सर्वात मोठी अशी ‘श्री मुरगेंद्रगौडा एस. पाटील करंडक खुली अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा – 2026’ आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देण्यासाठी बेळगाव शहरात आयोजित पत्रकार परिषदेत स्वतः ॲड. मुरगेंद्रगौडा एस. पाटील यांनी ही माहिती दिली. सदर अखिल भारतीय स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा शहरातील मध्यवर्ती सरदार्स मैदानावर खेळवली जाणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडकासह ५ लाख २७ हजार १२७ रुपये, तर उपविजेत्या संघाला २ लाख ५१ हजार १२७ रुपये इतकी बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीज (मालिकावीर) किताब पटकावणाऱ्या खेळाडूस अ‍ॅक्टिव्हा स्कूटर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांना टीव्ही संच, तसेच इतरही अनेक आकर्षक वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

 belgaum
cricket

देशभरातील विविध ठिकाणांहून टेनिस बॉल क्रिकेटमधील नामवंत आणि मातब्बर खेळाडू बेळगावमध्ये सहभागी होणार असून, त्यांच्या खेळातून प्रेरणा घेऊन स्थानिक खेळाडूंच्या खेळाचा दर्जा वाढावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले.

सध्या या स्पर्धेसाठी ४० हून अधिक संघांनी नाव नोंदणी केली असून, आणखीही संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेला ॲड. पाटील यांचे सहकारी तसेच श्री स्पोर्ट्स, खडक गल्लीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.