belgaum

गुप्तांग कापून भीषण खून; कित्तूर तालुका हादरला..

0
1328
 belgaum

बेळगाव  लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील हिरेनंदीहळ्ळी गावात एका व्यक्तीचा गुप्तांग कापून अत्यंत भीषण पद्धतीने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कलमेश कोटी (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी गावाजवळील मक्याच्या शेतात धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आली.हल्ल्यानंतर आरोपींनी मृतदेहाची विटंबना करत गुप्तांग कापून तेथून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कलमेश कोटी हे तुमकूर येथे होम केअरमध्ये काम करत होते. दहा दिवसांपूर्वी ते गावी परतले होते. ते आपल्या वृद्ध आईसोबत राहत होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांना सोडून दिले होते.

घटनेची माहिती मिळताच पत्नी आणि मुलगा गावात परतले आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. किट्टूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलीस आर्थिक व्यवहार, मालमत्ता व वैयक्तिक वाद या तीन अंगांनी तपास करत आहेत.

या अमानुष हत्येमुळे हिरेनंदीहळ्ळी गाव हादरले असून आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.