belgaum

खानापूरमध्ये अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0
278
Khanapur news
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव–पणजी राष्ट्रीय महामार्गावर खानापूर तालुक्यातील डुक्करवाडी क्रॉस परिसरात झालेल्या अपघातात कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत निंगप्पा (उर्फ बळीराम) शेट्टुप्पा धबाले (वय 66), रा. गणेबैल (ता. खानापूर) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलीस माहितीनुसार, एमएच-09/सीव्ही-1888 क्रमांकाची कार चालवत असलेला योगेश सैयाजी जाधव (वय 41), रा. आर. के. नगर, कोल्हापूर (महाराष्ट्र) हा बेळगावहून खानापूरकडे भरधाव वेगात जात होता. 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास डुक्करवाडी क्रॉसजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या केए-22/एचडब्ल्यू-5617 क्रमांकाच्या दुचाकीला मागून धडक बसली.

या धडकेत निंगप्पा धबाले यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर खानापूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मृत निंगप्पा धबाले यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित भाऊ व दोन विवाहित बहिणी असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.